महाराष्ट्र

आय एम ए महाराष्ट्र राज्य चेअरमन डॉ. संतोष कुलकर्णी यांची स्प्रिंग क्लिनिकला सदिच्छा भेट

माधवबाग तर्फे २२ मार्च रोजी मोफत हृदय विकार व मधुमेह नियंत्रण शिबिर

आय एम ए महाराष्ट्र राज्य चेअरमन डॉ संतोष कुलकर्णी यांची स्प्रिंग क्लिनिक ला सदिच्छा भेट. डॉ. यतीन जाधव (डायरेक्टर ऑफ स्प्रिंग क्लिनिक व अपरान्त हॉस्पिटल) व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले
*🟣 माधवबाग तर्फे मोफत हृदयविकार व मधुमेह नियंत्रण शिबीर*
“🔸*चिपळूणमध्ये माधवबाग क्लिनिकतर्फे २२ मार्च रोजी मोफत हृदयविकार, मधुमेह व स्थूलत्व तपासणी शिबिर*
*🔸हृदय तपासणी, ईसीजी, रक्तदाब व शुगर तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन*
*चिपळूण :* नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच , हृदयविकार आणि स्ट्रोक चा धोका कमी करण्यासाठी तरूण वयातच कोलेस्टेरॉल वर नियंत्रण ठेवल्यास आयुष्यभरातील हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो या उद्देशाने चिपळूण येथील माधवबाग क्लिनिक तर्फे रविवार, दि. २२ मार्च रोजी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्व तसेच आहार मार्गदर्शनाबाबत तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येणार आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबाग क्लिनिक चिपळूण तफे॔ करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये हृदयविकार तपासणी, ईसीजी (हृदयाची पडताळणी), रक्तदाब तपासणी (बीपी), रँडम ब्लड शुगर तपासणी तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण (SPO2) तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणी करून नागरिकांच्या आरोग्य स्थितीचे मूल्यांकन केले जाणार आहे.
तसेच मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांसारख्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाणार असून हृदयविकाराचा धोका किती आहे याचे ‘रिस्क असेसमेंट’ देखील करण्यात येणार आहे. नागरिकांना जीवनशैली सुधारण्यासाठी तसेच वजन नियंत्रण व ताण-तणाव व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. आहार तज्ज्ञांकडून योग्य आहार पद्धतीविषयी माहिती देण्यात येणार असून आहार व जीवनशैलीत बदल करून आरोग्य कसे सुधारता येईल याबाबत सल्ला दिला जाणार आहे.
हे शिबिर विशेषतः हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच कोलेस्टेरॉल वाढलेल्या व्यक्तींकरिता उपयुक्त ठरणार आहे. छातीत दुखणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, हात-पाय सुजणे किंवा अशक्तपणा जाणवणाऱ्या तसेच ३० वर्षांवरील व्यक्तींनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन क्लिनिक मार्फत करण्यात आले आहे.
हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर चिपळूण येथील *माधवबाग क्लिनिक, C/O स्प्रिंग क्लिनिक, जेड गार्डन, खेंड, चिपळूण* येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8177982990, 9922486260 किंवा 02355-261007 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!