महाराष्ट्र

“पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला”- दोषींवर कारवाई करा नाहीतर आंदोलन

छावा मराठा योद्धा संघाचे उत्तर जिल्हाध्यक्ष श्रीकांत कांबळी यांचा इशारा

*“पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला!” – “कारवाई करा, नाहीतर आंदोलन!” – छावा मराठा योद्धा संघटने उत्तर जिल्हाध्यक्ष श्रीकांत रामचंद्र कांबळी*

चिपळूण- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. शांत आणि सुसंस्कृत ओळख असलेल्या चिपळूणमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणावर छावा मराठा योद्धा संघटना आक्रमक झाली असून *उत्तर जिल्हाध्यक्ष श्रीकांत रामचंद्र कांबळी* यांनी थेट चिपळूण पोलीस स्टेशन प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेची निपक्षपाती चौकशी करून सीसीटीव्ही फुटेजमधील सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.

अन्यथा, छावा मराठा योद्धा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने चिपळूण पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात कारवाई न झाल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

या घटनेमुळे पत्रकार सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!