महाराष्ट्र

पत्रकारावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध : दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

चिपळूण -शहरातील बहादूर शेख नाका येथे २५ मार्च रोजी पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. चिपळूण सारख्या सुसंस्कृत आणि शांतताप्रिय शहरात पत्रकारांसारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय बाब असल्याची भावना पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना दिलेल्या निवेदनात ठसाळे यांनी नमूद केले आहे की, संबंधित घटनेबाबत आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे आहे. समाजात कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण होण्यासाठी या हल्ल्यातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात चिपळूणमध्ये पत्रकार किंवा कोणत्याही घटकावर असा भ्याड हल्ला करण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही, अशा प्रकारचा धडा प्रशासनाने घालून द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदन देताना तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्यासह शौकतभाई मुकादम, जयंद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, मनोज जाधव, सचिन साडविलकर, मिलींद कापडी, रघुनाथ भालेकर, विनायक पाटेकर, राजु सुतार आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक -जमालुद्दीन बंदरकर

मी जमालुद्दीन युसूफ बंदरकर, संपादक कोकण समाचार , गेली तीस वर्षे पत्रकारिता करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!