उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिपळूण तालुका अध्यक्षपदी सुभाष जाधव
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

चिपळूण ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुखपदी सुभाष जाधव
चिपळूण – तालुक्यातील गुहागर
मतदारसंघात समावेश असलेल्या ७२ गावांच्या तालुकाप्रमुखपदी ठाकरे शिवसेनेने पंचायत समितींचे
माजी उपसभापती सुभाष जाधव यांची नियुक्ती केली आहे.
मंगळवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकातून जाधव यांची निवड जाहीर झाली..
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीअगोदर पंचायत समितीचे माजी सभापती व ठाकरे शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांची ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून रिक्त असलेल्या तालुकाप्रमुखपदी जाधव यांची निवड झाली. मुख्याध्यापकपदावरून निवृत्त झालेले जाधव पंचायत समिती उपसभापतीही होते. आमदार भास्कर जाधव यांच्याशिफारशीनेच सुभाष जाधव यांच्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



