ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना बेलापूर च्या वतीने NCMC कार्ड शिबीर संपन्न
कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना, बेलापूर NCMC कार्ड शिबीर संपन्न
बेलापूर -ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना, सेक्टर, ८, कस्तुरबा उद्यान, सी.बी.डी. बेलापुर यांच्या वतीने व फेस्कामचे अध्यक्ष श्री.सुरेश ईश्वर पोटे यांच्या मार्गदर्शना नुसार एन. सी. एम. सी. कार्ड रजिस्ट्रेशन साठी शुक्रवार दि.२२/०५/२०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेलापूर, सी.बी.डी. विभागातील ७५ ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन संघटनेला धन्यवाद दिले. संघटनेचे मुख्य सचिव श्री. मोहन राणे, उपसचिव श्री. दीपक गवळी, दिलीप साळवी, श्री. व सौ.पोखरकर, के. के. सोनवणे व इतर कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचं सहकार्य केले.ज्येष्ठ नागरिकांनी ह्या कार्यक्रमाचे कौतुक करून संघटना करीत असलेल्या कार्याबद्दल संघटनेचे आभार मानले. संघटनेने नेहमीच असे उपक्रम राबवून ज्येष्ठांना आधार दयावा असे सुचविले. कार्यक्रमाची सांगता करीत सचिव मोहन राणे यांनी सर्व ज्येष्ठांचे आभार मानले व फेस्कॉम अध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे यांच्या शासन आपल्या दारीचे कौतुक करण्यात आले. फेस्कामचे मुंबई अध्यक्ष श्री. सुरेश पोटे व सर्व ज्येष्ठांना धन्यवाद दिले.




